तिमिरातुनी तेजाकडे- महाड व रोहा येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

मुंबई:- कोकणातील युवक-युवतींनी विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन प्रशासनाच्या अधिकारी पदांवर रुजू व्हावे; ह्या उद्देशाने सुरु झालेल्या `तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळी अंतर्गत `तिमिरातुनी तेजाकडे’ ह्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक कोकणचे सुपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) विद्यार्थ्यांना महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला घेणार असून निशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.

शनिवार, दिनांक १४ मे २०२२
दुपारी १.०० वा. एम. एम. असोसिएशन हॉल, महाड उत्पादक असोसिएशन सी.ए.टी.पी महाड एमआयडीसी (आयोजक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र महाड)

सायंकाळी ५.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड (आयोजक: युथ क्लब ऑफ महाड)

रविवार, दिनांक १५ मे २०२२
सकाळी ९.०० वा. ग्रामपंचायत कार्यालय सभागृह मुक्काम पोस्ट खांब, रोहा (आयोजक: ग्रुप ग्रामपंचायत खांब व एकता फाउंडेशन, वैजनाथ)

दुपारी १.०० वा. को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे, रोहा (आयोजक: को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा)

नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांना 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page