कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा केल्याबद्दल डॉ. सानिकाविरा सावंत यांचा सत्कार
मुंबई:- ओशिवरा आँर्चिड को. ऑप. हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्यावतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी मा. श्री.प्रमोद मेंडण यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सैय्यदसाहेब यांच्या शुभहस्ते कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा केल्याबद्दल डॉ. सानिकाविरा मोहनसिंह सावंत हीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. सानिका हीच्या आईवडीलांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
आपली प्रतिक्रिया देताना डॉ. सानिकाविरा हीचे वडील मोहनसिंह सावंत म्हणतात की, माझ्या कुटुंबावर परमपूज्य सदगुरु अनिरुद्ध बापूंची सदैव कृपा आहे. त्यांच्या कृपाछ्त्राखाली राहूनच माझ्या मुलांनी शैक्षणिक प्रगती केली. त्यांना सर्व सामर्थ्य बापूंनीच दिले. कु. सानिकाने लहानपणी धागडधिंगाना शिबिरात भाग घेऊन परमपूज्य नंदाईचा जो आशीर्वाद प्राप्त केला तो सानिकाला यशाकडे घेऊन गेला. डॉक्टर करण्यासाठी मी आणि माझ्या पत्नीने प्रचंड मेहनत घेतली; पण त्यामागेही बापूंचे `नाथसंविध’ होते. हे यश बापूंच्या चरणी समर्पित. डॉ. सानिकाला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण घ्यायचे आहे आणि गरीब कष्टकरी जनतेची वैद्यकीय सेवा करायची आहे. त्यासाठी बापूंनी तिला सामर्थ्य द्यावे; ही बापूंचरणी प्रार्थना!
डॉ. सानिकाविरा मोहनसिंह सावंत हीने गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनातर्फे यशस्वीपणे वैद्यकीय सेवा केली. तिने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. `पाक्षिक स्टार वृत्त’ परिवारातर्फे श्रद्धावानविरा डॉ. सानिकाविरा मोहनसिंह सावंत हीचे अनिरुद्ध अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा!
यावेळी श्री. प्रभुदेसाई (सेक्रेटरी), श्री. चेतन नाईक (खजिनदार) व सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी बंधू उपस्थित होते.