श्रीसाईसच्चरित, श्रीसाई संदेश आणि शिर्डीचे स्थान माहात्म्य सांगणारे श्रीसाईंचे गुणसंकीर्तन

।।ॐ साईराम।।

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

`सबका मालिक एक है।’ हा महामंत्र श्रीसाईनाथांनी दिला. परमात्म्याची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिमार्ग जीवनात स्थिर व्हावा म्हणून श्रद्धा आणि सबुरीची दोन नाणी श्रीसाईनाथांनी आपल्या प्रत्येक भक्तास दिली.

सद्गुरू तत्त्वाशी कसं वागावं? सद्गुरूंची भक्ती कशी करावी? भक्तीमार्गावर आपले जीवन कसे असावे? हे सांगण्यासाठी श्री साईनाथांनी हेमाडपंत विरचित श्रीसाईसच्चरित ग्रंथ प्रकट केला. ह्या श्रीसाईसच्चरित अर्थात साईगीतारुपी ग्रंथाचे पारायण, पठण, वाचन, श्रवण करताना आम्हा सामान्य भक्तांना काही शब्दांचा अर्थ समजत नाही, काही वाक्यांचा अध्यात्मिक संदर्भ कळत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरु श्रीसाईनाथांनी आम्हास कोणता उपदेश केला? श्रीसाईनाथांच्या शिर्डीमध्ये गेल्यावर कोणती पवित्र स्थानं कुठे आहेत आणि त्याचे अध्यात्मिक माहात्म्य काय? याचा आपणास उलगडा होत नाही म्हणूनच श्रीसाई भक्तीमध्ये अनेक वर्षापासून रममान झालेले, सद्गुरु तत्त्वाशी एकरूप झालेले, सद्गुरूंचे गुणसंकिर्तन करणारे दाससदू अर्थात श्री. सदानंद वर्तक यांनी आम्हा साईभक्तांसाठी खास पर्वणी आणली आहे.

श्रीसाईनाथांचे माहात्म्य संकिर्तन करण्यासाठी,
श्रीसाईसच्चरित सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी,
एवढेच नव्हे तर श्रीसाईनाथ अखंड लाभण्यासाठी,
श्रीसाईनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी…

यु ट्यूबवरती अत्यंत सुंदर असे व्हिडिओ त्यांनी तयार केले आहेत.

अतिशय गोड आवाज, स्पष्ट आणि शुद्ध उच्चार असलेल्या साईभक्ताच्या व्हिडिओंमधून आपणास खूप काही मिळते. साईंवर श्रद्धा ठेऊन हे व्हिडीओ श्रवण केल्यास…

आमच्या मनात श्रीसाईनाथांबद्दल प्रेम उत्पन्न होते,
बुद्धीत साईभक्ती स्थापित होते,
आमच्याकडून श्रीसाईनाथांचे गुणसंकिर्तन सहजपद्धतीने होते,
श्रीसाईसच्चरिताची गोडी लागते आणि श्रीसाईसच्चरित जीवनात कसे आणायचे ते समजते,
श्री साईसच्चरिताचे, श्रीसाईंच्या संदेशाचे आणि शिर्डीतील पवित्र स्थानांचे माहात्म्य कळून येते,
सद्गुरुतत्वाची भक्ती करण्याचा मार्ग सापडतो.

अशा अनेक महत्वाच्या जीवन सुंदर करणाऱ्या गोष्टी श्रीसाईनाथांवर श्रद्धा-सबुरी ठेवून सच्चे प्रेम करणारा भक्तच अशाप्रकारे आपणास श्रीसाई भक्तीची वाट दाखवू शकतो. म्हणूनच खालील लिंक वर क्लिक करून श्रीसाईभक्त दाससदू अर्थात श्री. सदानंद वर्तक यांचे व्हिडिओ पहा-श्रवण करा आणि साईंची कृपा मिळणाऱ्या मार्गावर प्रवास करा!

ॐ साईराम।। ॐ साईराम।। ॐ साईराम।।

-नरेंद्र हडकर

Shri Sai Sacharit Prathamodhaya Part 1 by Dassadu
Shri Sai Sacharit Prathamodhaya Part 2 by Dassadu

Shri Sai Sacharita Dwitiyodhaya Part 1 by Dassadu
Shri Sai Sacharita Dwitiyodhaya Part 2 by Dassadu
Shri Sai Sacharita Dwitiyodhaya Part 3 by Dassadu

Shri Sai Shirdi Darshan Part 1 by Dassadu
Shri Shirdi Darshan Partr 2 by DasSadu

Shri Sai Sandesh Part 1 by DasSadu
Shri Sai Sandesh Part 2 by Dassadu

You cannot copy content of this page