कलियुगात सर्व संकटांचा नाश करण्यासाठी अतिशय फलदायी ठरते; सुंदरकांडाचे पठण!

श्रीतुलसीदासरचित श्रीरामचरितमानसमधील पाचवा सोपान अर्थात सुंदरकांड श्रद्धायुक्त भावाने पठण केल्यास आपणास अनेकप्रकारे फलदायी ठरते.

१) सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होते.
२) आपण हाती घेतलेल्या कार्यात एकाग्रता वाढते.
३) आत्मविश्वास वाढतो.
४) उचित कामात सहजपणे यश मिळते.
५) अशक्य वाटणारे कार्य सिद्धीस जाते.
६) शांती, सुख, समाधान, समृद्धी प्राप्त होते.
७) घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
८) वाईट शक्ती, वाईट स्पंदनांचा नाश होतो.
९) परमात्म्याच्या कार्यात सहभाग वाढतो.
१०) आध्यात्मिक- सामर्थ्य प्राप्त होते.
११) आपल्याकडून परमात्म्याची श्रद्धेने प्रार्थना होते.
१२) परमात्म्यावरील भक्ती वाढते, विश्वास वाढतो आणि श्रद्धा दृढ होते.
१३) कलियुगातील सर्व पापांचा, त्रिविध तापांचा आणि सर्व संकटांचा नाश होतो.
१४) श्रीराम, जानकीमाता यांच्यासह हनुमंताची कृपा प्राप्त होते आणि ते प्रसन्न होतात.
१५) परमात्म्याच्या चरणांची स्थापना आपल्या हृदयात होते.

You cannot copy content of this page