जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 754 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 81 हजार 754 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण 9 हजार 713 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 828 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 185 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 763 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 79 हजार 137 व्यक्तींनी पहिला डोस तर 25 हजार 46 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 71 हजार 267 नागरिकांनी पहिला डोस तर 9 हजार 130 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस तर 5 हजार 661 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 33 हजार 185 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 25 हजार 860 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 71 हजार 980 लसी या कोविशिल्डच्या तर 53 हजार 880 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 79 हजार 98 कोविशिल्ड आणि 54 हजार 87 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 33 हजार 185 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 2 हजार 460 लसी उपलब्ध असून त्यापैकी 1 हजार 90 कोविशिल्डच्या आणि 1 हजार 370 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 780 लसी शिल्लक असून त्यापैकी 1 हजार 770 कोविशिल्ड आणि 10 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

You cannot copy content of this page