उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१

शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष नवमी १३ नोव्हेंबरच्या पहाटे ०५ वाजून ३१ मिनिटापर्यंत
नक्षत्र- धनिष्ठा दुपारी १४ वाजून ५२ मिनिटापर्यंत
योग- ध्रुव १३ नोव्हेंबरच्या पहाटे ०३ वाजून १४ मिनिटापर्यंत
करण १- बालव संध्याकाळी १७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव १३ नोव्हेंबरच्या पहाटे ०५ वाजून ३१ मिनिटापर्यंत
चंद्रराशी- कुंभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४६ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५९ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १३ वाजून ५० मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री ०० वाजून ३८ मिनिटांनी

भरती- सकाळी ०६ वाजून ०२ मिनिटांनी आणि सकाळी १८ वाजून ३० मिनिटांनी
ओहोटी- दुपारी १३ वाजून ०७ मिनिटांनी

दिनविशेष:- कुष्मांड नवमी, आज राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९०४: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्म साली झाला.
१९३०: साली पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
२००५: साली माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page