उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१

रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष चतुर्थी २५ ऑक्टोबरच्या पहाटे ०५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रोहिणी २५ ऑक्टोबरच्या रात्री १ वाजेपर्यंत
योग- वरियान रात्री २३ वाजून ३२ मिनिटापर्यंत

करण १- बव सायंकाळी १६ वाजून २१ मिनिटांपर्यंत
करण २- बालव २५ ऑक्टोबरच्या पहाटे ०५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०८ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २० वाजून ४५ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी

भरती- रात्री ०१ वाजून ४७ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून २९ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ३१ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे संकष्ट चतुर्थी.

ऐतिहासिक दिनविशेष:
आज आहे संयुक्त राष्ट्र दिन. संयुक्त राष्ट्र संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती देण्यासाठी दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा केला जातो.

२०१३ साली मन्ना डे यांचे निधन झाले. सिनेमाजगतातील सुप्रसिद्ध पार्श्व गायक प्रबोध चन्द्र डे यांना प्रेमाने मन्ना डे असे संबोधित केले जायचे.

You cannot copy content of this page