कोरोनाचे आज २९४० नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४४ हजार ५८२

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

You cannot copy content of this page