अनिरुद्ध पहाट-२ सद्गुरु तत्त्वच सर्वोच्च व परमश्रेष्ठ तत्त्व!

।। हरि ॐ।।

सद्गुरु तत्त्वाचा अधिपती श्रीदत्तगुरु श्रीदत्तात्रेय!
भोलेनाथ महादेव असो वा श्रीगणेश असो किंवा आदिमातेचा कोणतेही रूप अवतार असो! श्रीराम असो वा श्रीहनुमंत! पवित्र दैवत असो वा मानवी देह धारण करणारे सद्गुरु श्रीस्वामी समर्थ असो वा श्रीसाईनाथ किंवा श्रीअनिरुद्ध असो!

प्रत्येकाला त्याच्या त्याच्या संस्कारातून एक वा अधिक आवडती दैवतं असतात. कोणत्याही पवित्र-शुभ दैवताला किंवा सद्गुरु तत्वाला केलेला नमस्कार त्या एकाच परमात्म्याला अर्थात केशवाला जाऊन मिळतो. त्याची नामं, त्याची रूपं वेगळी असतील पण आमची श्रद्धा- आमची भक्ती त्या एकाच सद्गुरु तत्वाकडे पोहोचते! ते सद्गुरु तत्व कसे आहे?

ह्या सद्गुरु तत्त्वापेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नसते! त्यामुळे सद्गुरु सेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ असे अन्य तप नसते; हे ज्ञानच सर्वश्रेष्ठ ठरते!

सद्गुरु तत्त्व सर्वोच्च, परमश्रेष्ठ तत्त्व आहे; हे सत्य जाणून घेणेच भक्तासाठी-श्रद्धावानासाठी खरेखुरे ज्ञान असते!

सद्गुरूंचे रूप, सद्गुरूंचे नाम, सद्गुरूंचे चरण हे सर्वोच्च असते; ते जाणल्याशिवाय मानवाला खरीखुरी गती मिळणार नाही आणि ते जाणल्यास जी गती मिळते ती अनिरुद्ध गती असते. त्या गतीला कोणीही रोखू शकत नाही आणि ती गती त्या सद्गुरू तत्वाच्या नियोजनानुसार ठरते!

-`स्टार वृत्त’ ०१०५२०२५

अनिरुद्ध पहाट-१ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

error: Content is protected !!