संगणक शिक्षण क्षेत्रात महान कार्याबदल श्री. गणेश केशव परब यांना कृतज्ञता सन्मानपत्र

मुंबई – कालच साई गजानन मंदिर ट्रस्ट ह्या सेवाभावी संस्थेच्यावतीने शारदा कॉम्पुटर क्लासेसचे संचालक श्री. गणेश केशव परब यांच्या संगणक क्षेत्रातील महान कार्याबदल कृतज्ञता सन्मानपत्र भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. निलेश शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी शारदा कॉम्पुटरच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. शारदा कॉम्पुटर क्लासेसचे संचालक श्री. गणेश केशव परब गेल्या २५ वर्षात विभागातील कष्टकरी कामगारांच्या हजारो मुलांना एमएस सीआयटी कोर्सच्या माध्यमातून संगणक साक्षर करून नोकरीसाठी सुयोग्य केले. आज असंख्य विद्यार्थी नोकरी- व्यवसाय करून जीवनात स्थिर झाले आणि स्वतःची प्रगती केली आहे.

error: Content is protected !!