सिंधुदुर्गात बायोफ्लाँक कोळंबी प्रकल्पातून चाकरमानी पिता-पुत्राची लाखो रुपयांची कमाई

कोकणातील तरुणांनी दुरदृष्टीने काम करण्यास सुरुवात केली तर ते वर्षाला लाखो रुपये कमाई करू शकतात. मुळ ओसरगावातील मुंबईतील चाकरमानी पिता-पुत्राने हे शक्य करुन दाखविले आहे. एका गुजरात राज्यातील सी-फुड कंपनीच्या सहकार्याने त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.

मी स्वतः कुडाळचे अविनाश पराडकर यांच्या समवेत ओसरगाव आणि कलमठ येथील देवदत्त अरदकर यांच्या अशा दोन प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली. कलमठ येथील प्रकल्पातील कोळंबी वाढत आहे. तर ओसरगाव येथील कोळंबीची विक्री झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे अर्थशास्त्र समजावून घेण्यासाठी किरण राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी किरण हे मुंबईतील मंत्रालयात तर वडील पोलीस म्हणून नोकरी करतात, असे सांगितले. ओसरगाव येथील आणि सध्या मुंबईत वास्तवात असलेले श्री. किरण राणे आणि त्यांच्या वडिलांनी मिळून ओसरगाव तलावानजीक मुंबई-गोवा महामार्गालगत रहात्या घरासमोर गुजरातच्या एका सी-फुड कंपनीच्या मार्गदर्शनाखाली मत्स क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बायोफ्लाँकच्या (जैव-पुंज) दहा हजार पाणी क्षमतेच्या टारपोलिन ताडपत्रीच्या सहाय्याने पाच फुट उंचीच्या पाच मोठ्या टाक्या उभारल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी त्यामध्ये कोळंबीचे बीज सोडले, अशी माहिती देऊन त्यांना या प्रकल्पासाठी आजवर बारा लाख रूपये खर्च आला. पैकी आठ लाख रुपये खर्च हा प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्यासाठी आला. चार लाख रुपये खर्च हा कोळंबीचे दैनंदिन खाद्य, पगार इत्यादीवर आला. अलीकडे संबंधित कंपनीने पाच महिने वाढ झालेली सुमारे साडेचार हजार किलो कोळंबी साडेतीनशे रूपये किलो दराने खरेदी केली. त्यातून त्यांना सोळा लाख रुपये एवढे भरघोस उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता त्यांना सहा महिन्यांत चार लाख रूपयांचा फायदा झाला.

सध्या ओसरगाव येथील या प्रकल्पामध्ये पुढील नवीन कोळंबीची बँच टाकण्याची पूर्व तयारी सुरू आहे. त्यासाठी आता त्यांना आगामी पाच महिन्यांसाठी कोळंबी टाक्यांमध्ये वाढविण्यासाठी सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या बँचप्रमाणे त्यांना पंधरा-सोळा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या बँचमधून त्यांना दहा लाख रुपयांचा निव्वळ फायदा अपेक्षित आहे. या गणिताप्रमाणे पुढच्या वर्षी त्यांनी दोन बँच घेतल्यावर त्यांना वीस लाख रुपयांचा फायदा अपेक्षित आहे.

मी काही समविचारी सहकारी मित्रांसमवेत गेले आठ-दहा महिने या बायोफ्लाँक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करीत आहे. त्याचबरोबर शेळीपालन, गावरान कोबंडीपालन, विषेशतः वर्षाला २५० ते ३०० पर्यंत अंडी देणाऱ्या कोबंडीचे पालन या प्रकल्पांवर काम करीत आहोत. जांभुळ-फणसाची, वनौषधी आदींची व्यवसायिक लागवड आदी उत्पादनांवरही काम करीत आहोत. त्यांच्या उभारणीसाठी एका सार्वत्रिक भागीदारी संस्थेची नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील तरुणांना स्वयंम उद्योग उभारण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमीनी जमीन मालक या संस्थेला प्रामुख्याने भाडे तत्वावर कराराने तर काही जमीनी खरेदी करण्यासाठी पुढे आले आहेत.

या संदर्भात अधिक माहितीसाठी ९४२२३८१९९३ माझ्याशी संपर्क साधावा!

कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक,
पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण

You cannot copy content of this page