सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी दि. 13:- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे नुकतेच झाले. http://sindhudurgtourism.in/ असे जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निवासस्थाने, समुद्रकिनारे, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती इत्यादी सर्व माहिती येथे उपलब्ध होणार असून वरील संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, परीविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी संजीता महोपात्रा आणि जिल्हा माहिती व तंत्रज्ञान विभागातील बसवराज चिकोडी आणि शशांक नाईक आदी उपस्थित होते.