ध्येयाच्या पूर्ततेसाठी अनिरुद्ध अभिनंदन!

कु. डॉ. सानिका मोहन सावंत यांना काल गुरुवारी अतिशय कौतुकास्पद सुयश प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून ७२ व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अनिरुद्ध अभिनंदन!

वडील मोहन सावंत शासकीय निवृत्त वरिष्ठ लिपिक आणि आई मुग्धा सावंत निवृत्त शिक्षिका यांच्या मार्गदर्शनातून आणि परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेतून कु. डॉ. सानिका यांनी मिळविलेले सुयश खरोखरच कौतुकास्पद आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे! पुढील दोन-तीन वर्षात कु. डॉ. सानिका एम. डी. झालेल्या असतील आणि समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा करण्यासाठी त्या नेतृत्व करतील; अशी त्यांची वाटचाल आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सुसंस्कार त्यांना आई-वडिलांनी दिले आहेत. समाजहितासाठी विधायक विचारांची बैठक आणि त्या विचारांच्या अधिष्ठानातून नियोजनबद्ध कृती आवश्यक असते आणि असे कार्य मोहन सावंत नियमित करीत असतात. त्यांच्याच प्रेरणेने आणि शिस्तबद्ध आईच्या सहवासात कु. डॉ. सानिका यांनी आपल्या ध्येय पूर्ततेची अंतिम पायरी गाठली आहे.

`मुलगी शिकली प्रगती झाली!’ ह्या बोधवाक्याचा आदर्श घेऊन अनेक घरांमध्ये मुली शिकल्या आणि प्रगती झाली. पण शिक्षणाबरोबर घरातील मुलगीचं अर्थात स्त्रीचे आरोग्य अतिशय महत्वाचे असते आणि त्यासाठीच डॉ. सानिका यांचा `स्त्रीरोगतज्ञ’ होण्याचा मानस आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा! वैद्यकीय सेवेचे खूप मोठे कार्य घडण्यासाठी डॉ. सानिका यांना सामर्थ्य मिळावे; ही आदिमाता आणि सद्र्गुरु चरणी प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

 

Aniruddha Congratulations for achieving the goal!

Dr. Sanika Mohan Sawant has received a very admirable Success on Thursday. She has passed the All India Ayurveda Post Graduate Entrance Examination at 72nd position from all over India. Congratulations!

Under the guidance of father Mohan Sawant, retired senior government clerk and mother Mugdha Sawant, retired teacher, and with the grace of Parampujya Sadguru Aniruddha Bapu, The Success acquired by Dr. Sanika is truly admirable and a source of pride for us! In the next two-three years, Dr. Sanika M. D. Will be done and they will lead to serve the neglected elements of the society; That is their way. They have been given the necessary culture by their parents. For the benefit of the society, a meeting of constructive thoughts and planned action from the foundation of those thoughts is required and such work is done regularly by Mohan Sawant. With her inspiration and in the company of a disciplined mother, Dr. Sanika has reached the final stage of fulfilling her goal.

“The girl has learned and made progress!” Following this motto, girls learned and progressed in many homes. But along with education, the health of the girl in the house is very important and that is why Dr. Sanika wants to be a gynecologist. Congratulations to the fortnightly `Star Vrutta’ family for their next journey! To do a great job of medical service. Dr. Sanika should be empowered; This is the prayer at the Charan of Adimata and Sadhguru!

-Narendra Hadkar

 

You cannot copy content of this page