संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विजय एस. ठाकूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांची कालच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्ती केली. अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांच्या ह्या निवडीने महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष आणखी बळकट होणार असून अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाचे उत्तमरीत्या कार्य करणाऱ्या अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांना बढती देऊन कामगारांच्या न्याय हक्कांसाठी, कष्टकरी जनतेच्या बाजूने लढणाऱ्या व्यक्तिमत्वाला प्राधान्य देत राज्य पातळीवर कार्य करण्याची संधी दिली आहे. गेली पस्तीस वर्षे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तसेच राजकीय क्षेत्रात अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. विशेषतः कष्टकरी गरीब जनतेच्या प्रश्नांवरती त्यांनी नेहमीच आक्रमक पण अभ्यासू भूमिका मांडली. अन्यायग्रस्त कामगारांच्या-अधिकाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा देत एका आदर्श नेतृत्वाची झलक राज्याला दाखविली आहे. त्यांच्या ह्या लोकप्रियतेमुळे राज्यातील अनेक कामगार, कामगार संघटना, अधिकारी व अधिकाऱ्यांच्या संघटना त्यांचा नेहमी कायदेशीर सल्ला अंतिम मानून वाटचाल करतात व यशस्वी होतात. म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांना नियुक्ती पत्र देताना म्हटले आहे की, “सर्व स्तरातील कामगारांचे संघटन करण्याचे व कामगार क्षेत्रातील सर्व आघाड्या आपल्या अंकित ठेवून कार्य करण्याचे तसेच महाराष्ट्रात कामगार संघटन करण्याचे आपणास अधिकार देण्यात आले आहेत. आपले सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील योगदान तसेच कामगारांच्या हिताचे केलेले कार्य व पक्षाच्या व्यापकतेसाठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने आपली नेमणूक केली आहे. आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगिण विकासाचे कार्य करून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्यासाठी प्रयत्न कराल; ही आशा आहे. पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांचे कार्य आम्ही अगदी जवळून बघितले आहे. त्यांच्याकडे कित्येकवेळा अन्यायग्रस्तांची मी समस्या घेऊन गेलो तेव्हा त्यांनी केलेले सहकार्य कधीच विस्मरणात जाणार नाही. जात-पात न बघता ते बहुजन समाजासाठी करीत असलेले कार्य नेहमीच कौतुकास्पद असते. अशा समाजाप्रती समर्पित भावनेने सदैव कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला जेव्हा सर्वोच्च राजकीय पदं मिळतात तेव्हा ती जनतेसाठी उपयुक्त ठरतात. हे अ‍ॅड. विजय एस. ठाकूर नक्कीच दाखवून देतील.

अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांच्या ह्या निवडीमुळे त्यांचे कौतुक होत असून त्यांचे सर्वच थरातून अभिनंदन होत आहे. “खऱ्या अर्थाने एका सामाजिक-राजकीय जाणीव असणाऱ्या प्रामाणिक कार्यक्षम नेत्याला मिळालेली ही संधी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करील;” असे मत पाक्षिक `स्टार वृत्त’चे संपादक नरेंद्र हडकर यांनी व्यक्त केले असून अ‍ॅड. विजय एस. ठाकूर यांचे पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

-मोहन सावंत

You cannot copy content of this page