कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाबाबत घ्यायची काळजी…

सावध राहा…

१) घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या.
२) प्रतिबंध आणि काळजीसाठी खाली पहा.
३) जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तर लॅबोरेटरीमध्ये तपासणी करू शकता.
४) तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तरच COVID 19ची तपासणी करू शकता.
५) तुमच्यात दिसत असलेल्या लक्षणांचे निरीक्षण करा आणि जर काही त्रास झाल्यास व तीव्र लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्या.

हे करू नका! …

१) गर्दीच्या ठिकाणी सहभाग घेऊ नका.
२) जर आपल्याला खोकला आणि ताप येत असेल तर कोणाशीही जवळचा संपर्क साधू नका.
३) डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करु नका.
४) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

हे करा! …

१) साबण किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर ने वारंवार हात धुण्याचा सराव करा
२) शिंकताना आणि खोकताना आपले नाक आणि तोंड रुमाल / टिशूने झाकून ठेवा
३) वापरलेला टिशू ताबडतोब बंद कचरापेटीत फेकून द्या
४) आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांना भेटा (ताप, श्वास घेण्यात त्रास होणे आणि खोकला). डॉक्टर भेट देताना तोंड आणि नाक झाकण्यासाठी मास्क / रुमाल चा वापर करा
५) आपल्याला ही लक्षणे असल्यास या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क करा +91 2026127394 or 104 or 011-23978046

You cannot copy content of this page