विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई:- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-

श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा), श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).

श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).

श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).

श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.).

नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-

श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष).

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.

You cannot copy content of this page