जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम

अक्षरोत्सव परिवार आणि मेधांश व श्रावणी कंप्युटर आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम

तळेरे:- येथील अक्षरोत्सव परिवार, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन व कासार्डे येथील मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून १४८ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, ग्राहक संरक्षण चळवळीचे सदस्य प्रा. एस. एन. पाटील, कासार्डे विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे नुतन अध्यक्ष विनय पावसकर, अध्यक्ष अशोक मुद्राळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाताडे, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, कवी व अभिनेते प्रमोद कोयंडे, मोटीवेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ, वारगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, वामनराव महाडिक विद्यालय- तळेरेचे मुख्याध्यापक एस्. जी. नलगे, विजयानंद गायकवाड, जिल्हा परिषद केंद्रशाळा गवाणे मुख्याध्यापक अरुण पवार, जितेंद्र पेडणेकर, शासकिय रुग्णालय प्राध्यापिका सौ. अनिता मदभावे, कासार्डे केंद्र शाळेचे मुख्याध्यापिका सौ. रंजना नारकर, तंबाखू प्रतिबंध अभियान कुडाळ चे सदानंद गावडे, परशुराम परब, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, संजय भोसले, उदय दुदवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांचे अक्षरोत्सव परिवार आणि मेधांश व श्रावणी कंप्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम विजेते अभिजित राणे (कासार्डे), द्वितीय विजेते युवराज आजगावकर (वारंगाची तुळसुली-कुडाळ) आणि तृतीय विजेते संतोष जाधव (रानबांबुळी-कुडाळ) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी स्पर्धेमागील भुमिका व्यक्त करताना संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर म्हणाले की, प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रमास विलंब झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुढिल वर्षी ही स्पर्धा विशेषत: शालेय मुलांसाठी आयोजित केली जाईल.