आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान!

मुंबई (मोहनसिंह सावंत):- वेंगुर्ल्याचे सुपुत्र आचार्य रविंद्रसिंह आप्पा मांजरेकर यांना नुकताच `महाराष्ट्र रत्न’ हा मानाच्या पुरस्कार प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात देण्यात आला. त्यावेळी आचार्य मांजरेकर यांना गुरुप्रसाद दिगंबर गुरुजी यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आचार्य मांजरेकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

अपराध निवारण भ्रष्टाचार विरोधी समिती आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महाराष्ट्रात विविध क्षेत्रात आदर्श आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. ह्यावर्षी `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्राप्त यादीत आचार्य रविंद्रसिंह अप्पा मांजरेकर यांचे नाव अग्रस्थानी होते.

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना प्राचीन भारतीय प्राच्यविद्येत प्रशिक्षित करून आचार्यपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे स्वतः आचार्य रविंद्रसिंह अप्पा मांजरेकर सेव्हन डॅन ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन असून त्यांनी १९९० साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर आर्ट ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पोलीस, सिव्हिल डिफेन्स होमगार्ड, फायमार्शल बटालियन एनसीसी गर्ल, मंत्रालय, सेंटजॉर्ज रुग्णालय कर्मचारी- अधिकारी इत्यादी तसेच अनेक युवक – युवतींना प्रशिक्षित केले आहे. बालकांना आणि महिलानां स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची संस्था नेहमीच अग्रेसर असते. गोशीशो काई कान कोबूडो इंटरनॅशनल अमेरिका ह्या संस्थेचे ते भारताचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी आजपर्यंत केलेला प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. ह्या प्रवासात त्यांनी हजारो लोकांना स्वतःचे संरक्षण करण्याबरोबर शरीराची-मनाची तंदुरुस्ती आणि सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. ह्या सर्व यशाचे सर्व श्रेय ते आपल्या सद्गुरूंना देतात आणि आत्मसात केलेली विद्या सद्गुरु चरणी समर्पित करतात. म्हणूनच त्यांचे कार्य जगभरात कौतुकास्पद मानले जाते.

यावेळी अनेक विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर आर्ट ह्या संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडूनही त्यांचे मनःपूर्वक अनिरुद्ध अभिनंदन!

(व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा! https://www.youtube.com/watch?v=EkjpsGHqpFs)

You cannot copy content of this page