कॉस्मोपॉलिटन असोसिएशनतर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा!

https://www.youtube.com/watch?v=fm26UxcsB4k

मुंबई:- जोगेश्वरी (पश्चिम) पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असोसिएशनतर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. श्रीमती फारुख खान आणि श्रीमती सुधा बामणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविक भाषणात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असोसिएशनचे सेक्रेटरी मोहन सावंत यांनी झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आणि पुढील कार्य कसे करायचे यासंदर्भात निवेदन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमती फारुख खान आणि श्रीमती सुधा बामणे यांचा सत्कार करण्यात आला; तर प्राध्यापक भिमा बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. भिमा बनसोडे यांचा निज्जामुद्दिन चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती शब्बिरा शेख, श्री. शरद हट्टगडी व कु. दक्षिता मिश्रा यांनी गायली देशभक्तिवर गाणी गायली. श्रीमती मंजू गुप्ता यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर श्री. मुख्तार अहमद, चेतन नाईक आणि अक्रमभाई यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील पदाधिकारी, सभासद आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. देशप्रेमाने सर्वांनी संघटित होऊन आंनदाने प्रजासत्ताक दिन साजरा केला.

Cosmopolitan CHS Association Celebrates 73rd Republic Day with great enthusiasm

Mumbai: – Cosmopolitan CHS Association at Jogeshwari (West) Pataliputra Nagar the 73rd Republic Day was celebrated with great enthusiasm by the Society Association. Various events were organized at that time. The flag hoisting was done by Mrs. Farooq Khan and Mrs. Sudha Bamne.

In his introductory speech, Secretary of the Society Association Mohan Sawant reviewed the development work done and wished a happy Republic Day by making a statement on how to carry out further work.

Mrs. Farooq Khan and Mrs. Sudha Bamne were felicitated; Professor Bhima Bansode guided the audience. Bhima Bansode was felicitated by Nijjamuddin Chaudhary. Mrs. Shabbira Sheikh, Mr. Sharad Hattagadi and Dakshita Mishra sang songs on patriotism. Mrs. Manju Gupta moderated the program while Mr. Mukhtar Ahmed, Chetan Naik and Akrambhai managed the event.

Cosmopolitan CHS members and their families from all the societies coming under the Society Association were present. Everyone united with patriotism and celebrated the Republic Day with joy.