कॉस्मोपॉलिटन असोशिएशन आणि ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
गार्डनचे उदघाटन व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न
मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन आणि ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साजरी करण्यात आली. त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या आमदार फंडातून झालेल्या दुसऱ्या गार्डनचे उदघाटन आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या शुभहस्ते आणि कार्यसम्राट नगरसेवक योगीराज दाभाडकर व रंजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या सौजन्याने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.
यावेळी आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडकर व नगरसेवक रंजना पाटील यांचा कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन आणि ओम साईधाम देवालय समितीच्यावतीने शाल- श्रीफळ- पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मंजू गुप्ता यांचा सत्कार आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी केला.
पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनचे सेक्रेटरी मोहन सावंत यांनी केले. यावेळी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनचे खजिनदार मुक्तार अहमद व सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ओम साईधाम देवालय समितीचे अध्यक्ष रवी जाधव, सेक्रेटरी रेश्मा मोहिते, खजिनदार चेतन नाईक व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.