निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला अनेक मान्यवरांची भेट!

सिंधुदुर्ग:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संदेश पत्र संग्रहातील विविध मान्यवरांची पत्रे पाहून अरुण घाडिगावकर यांनी विविध मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला.

तळेरे येथील निकेत पावसकर यांच्याकडील संदेश पत्र संग्रहात देश-परदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील भारतीय पोस्ट कार्डवर संदेश पत्रे आहेत. या संग्रहाचे तळेरे येथे आगळेवेगळे अक्षरघर निर्माण केले असून त्याला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ, रुपेश रेडेकर यांनी सादिच्छा भेट दिली. यावेळी या संग्रहातील अनेक संदेश पत्रे पाहताना विविध मान्यवरांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

मान्यवरांच्या आठवणींना उजाळा 
संदेश पत्र संग्रहातील संदेश पत्रे पाहिल्यानंतर अरुण घाडिगावकर यांनी कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नाट्य लेखक, अभिनेते गंगाराम गवाणकर, क्रिकेटपटू विनोद कांबळी, संगीतकार पं. यशवंत देव, अशोक पत्की, व्दारकानाथ संझगिरी, गुरुवर्य रमाकांत आचरेकर, आंतरराष्ट्रीय कीर्तिचे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि समिक्षक डॉ. अशोक केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे पाहिल्यानंतर अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.


“तुझे श्रम आणि तुझा छंद नजरेने पाहिल्यानंतर निशब्द! ही एकच शब्दाची प्रतिक्रीया देणे योग्य ठरेल. सातत्य कष्ट व वेळ खर्चणे हे तुझा ‘जिवनव्याप’ सांभाळून कसे राहू शकतोस? हा प्रश्न घेऊन तुझ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो.” 
-श्री. अशोक करंबेळकर, ज्येष्ठ पत्रकार

“तुमच्या अक्षरोत्सव घराला भेट देण्याचा योग आला. खुप आनंद झाला. तुमच्या श्रमणाऱ्या, धडपडणाऱ्या हातापावलांना खुप खुप शुभेच्छा!”
-श्री. बी. के. गोंडाळ, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक, जुवाटी माध्यमिक विद्यालय


यावेळी अभिनेते, लेखक प्रमोद कोयंडे उपस्थित होते. प्रमोद कोयंडे यांच्या हस्ते अरुण घाडिगावकर यांना भारतीय पोस्ट कार्डवरील शुभेच्छा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.


अक्षरघराला यांनी दिली भेट

तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कांबळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page