प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदळाचे वाटप

मुंबई:- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै २०२० या महिन्याचे नियमित अन्नधान्याचे ७१ % इतक्या शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आलेले आहे व त्यासोबतच प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत २४८१ मे.टन गहू व २३१० मे.टन तांदूळ इतक्या अन्नधान्याचे १८ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई चे कैलास पगारे यांनी दिली.

अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून तसेच संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page