डॉक्टर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!

सिंधुदुर्गातील ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनचा
खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांना पाठींबा!

कणकवली (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा कशी हतबल ठरत आहे; त्याचे वाईट अनुभव जिल्हावासिय घेत आहेत. या आणीबाणीच्या काळात जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी आणि त्या रुग्णालयांच्या डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला; पण त्यांनाच बदनाम करण्याचा उपद्व्याप काहींनी केल्याने जिल्ह्यातील खाजगी कोविड रुग्णालयाचे डॉक्टर अतिशय नाराज झाले असून त्यांनी त्याबाबत आमच्या प्रतिनिधीकडे तीव्र प्रतिक्रिया नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे. `कोरोना महामारीच्या चिंताजनक काळात कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीशी आमची संघटना उभी आहे!’ असे सिंधुदुर्ग ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संस्थेने डॉक्टरांना पत्र देऊन जाहीर पाठींबा दिला आहे.

सदर पत्रात सिंधुदुर्ग ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संस्थेने डॉक्टरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा आपणा सर्वांमुळेच ह्या कोविडच्या काळात सुद्धा सुरळीत चालू आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना आपण प्रामाणिकपणे व प्रभावीपणे शासनाचे सर्व नियम व अटी पाळून सेवा देत आहात. तरीही काही शासकीय अधिकारी, ठराविक प्रसार माध्यमं, काही राजकीय नेते आणि काही व्यक्ती विनाकारण त्रास देत असतील तर आमची संघटना सदैव आपले पाठीशी ठामपणे उभी आहे.

ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संस्थेने पत्राद्वारे जाहीर केलेल्या पाठिंबा महत्त्वाचा असून कोरोना महामारीशी लढाई करताना खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांचे मनोबल वाढविणारा आहे. कोरोना काळात प्रशासन नेहमी गोंधळलेले निर्णय घेत आहे. त्यातच काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठ बिले वसूल केली. ज्यांच्या विरुद्ध अशा तक्रारी आहेत, त्यांची चौकशी करणे अपरिहार्य आहेच; परंतु दुसऱ्या बाजूला काही खाजगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्तांना आधार देत त्यांचा जीव वाचविला. खऱ्या अर्थाने शासनाचे काम त्यांनी जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे केले. त्यांना त्रास देण्याच्या हेतूने काही प्रशासकीय अधिकारी नोटिसा पाठवून आणि काही प्रसार माध्यम बदनामीकारक बातम्या देऊन प्रामाणिक डॉक्टरांच्या हेतूवर संशय व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात संबंधित डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली असून जिल्ह्यामधील रुग्णांना चांगली सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना सर्वांनी सहकार्य करण्याचे गरजेचे आहे, असे आवाहन ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संस्थेचे सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर, कणकवलीचे कार्याध्यक्ष श्री. हनिफ पीरखान, कणकवली तालुका सहसचिव संजना सदडेकर आणि सदस्य डाॅ. हर्षदकुमार पटेल यांनी केले आहे.

You cannot copy content of this page