भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू असल्याचे दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जांचे नुतनीकरण दि. 28 फेब्रुवारी 2022 अखेर करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील; असे पत्रकार नमुद केले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी व नुतनीकरण करण्यात आलेले आहे, अशा अर्जांची छाननी करून अर्ज मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी तात्काळ करावी; असे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी, दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधावा.