एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारीला कणकवली उपकेंद्रावर होणार!

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.22: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2021 ही शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली आणि एस.एम.हायस्कूल कणकवली, या उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपरी 12 अशी असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे.

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, बैठक क्रमांक KD001001 ते KD001432, एस.एम.हायस्कूल, कणकवली बैठक क्रमांक KD002001 ते KD002384 व कणकवली कॉलेज कणकवली बैठक क्रमांक KD003001ते KD003282 याप्रमाणे आहेत. या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
१) आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
२) अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
३) परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.
४) परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे.
५) आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक/भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
६) जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page