पोईप ग्रामपंचायतीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उपसरपंच संदिप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण (संतोष हिवाळेकर):- पोईप ग्रामपंचायतीत लसीकरण केंद्राचे उपसरपंच संदिप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ग्रामसेवक ए. बी. गर्कळ, माजी सरपंच श्रीधर नाईक, आरोग्यसेवक चेतन कडुलकर, आरोग्य सहाय्यक एस. बी. आयोनडकर, आशासेवीका शुभदा वर्दम, सौ करिश्मा दळवी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

पहिली लस उपसरपंच संदिप सावंत यांनी घेतली आणि शुभारंभ केला. उपसरपंच संदिप सावंत यांनी पात्र असणाऱ्या सर्वांनी लस घेण्याचे आवाहन केले.