पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥

पंढरपूर:- कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटरवर म्हणताहेत…

पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे॥

अदभूत, आनंदी, अविस्मरणीय पहाट..
सौभाग्य… विठ्ठलाची कृपा !
कार्तिकी एकादशीनिमित्त आज पुन्हा एकदा पंढरपूर येथे श्री विठुराया आणि रखुमाईची सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
श्री विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव हीच विठुरायाचरणी प्रार्थना !
पांडुरंग! पांडुरंग!!
विठ्ठल विठ्ठल !
https://x.com/Dev_Fadnavis/status/1727531094734709238?s=20

You cannot copy content of this page