कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.च्या आवारात वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम संपन्न!

मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.च्या आवारात दिनांक १५ जून २०२१ रोजी सकाळी वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी लोकप्रिय नगरसेवक राजू पेडणेकर, महानगरपालिका बागबगीचा अभियंता, महानगरपालिका अधिकारी, स्थानिक नेते, त्याचप्रमाणे कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.चे अध्यक्ष- प्रमोद मेंडन, सरचिटणीस- मोहन सावंत, खजिनदार- मुख्तार अहमद, सैय्यदसाहेब, चेतन नाईक यांच्यासह कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो. अंतर्गत येणाऱ्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

त्यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला होता. तर आजूबाजूच्या परिसर स्वच्छ करून मच्छर प्रतिबंधक धुराची फवारणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमात सरचिटणीस- मोहन सावंत यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की, प्रतिवर्षाप्रमाणे पाच जून रोजी पर्यावरण दिन आपण साजरा करतो; परंतु पावसामुळे तो रद्द करून आज मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमाला सर्वांनी उत्साहपूर्ण उपस्थिती दाखविल्याबद्दल मी सर्वांचा असोसिएशनच्यावतीने आभारी आहे. सामाजिक कार्यात अशाप्रकारचा सर्वांचा सहभाग असल्यास सामाजिक कार्य सहजतेने यशस्वी होते.

असोसिएशनचे सल्लागार सैय्यद साहेबांनी लोकप्रिय नगरसेवक राजू पेडणेकर, महानगरपालिका बागबगीचा अभियंता, महानगरपालिका अधिकारी, मान्यवरांचे विशेष आभार मानून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कॉस्मोपॉलिटन को. ऑप. सो. असो.चे सरचिटणीस- मोहन सावंत पर्यावरणाचे नेहमीच कार्य करतात. त्यानिमित्ताने त्यांना विशेष प्रशस्तिपत्रक युवा केअर फाउंडेशन मार्फत देण्यात आले.

 

You cannot copy content of this page