पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांचा सत्यवान यशवंत रेडकर यांच्याकडून सत्कार
सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग पुत्र व पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन शाल तसेच श्रीफळ देऊन श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा प्रणेता) यांनी केला.
त्यावेळी आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सहसंस्थेचे सेक्रेटरी श्री. विलास सत्यप्पा मोरे उपस्थित होते. “गंगावणे सर हे माझ्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना भेटल्यावर आनंद द्विगुणीत झाला. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असेल.” अशी प्रतिक्रिया श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी दिली.