पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१

शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष षष्ठी रात्री २० वाजून ०९ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी २६ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
योग- प्रीति सकाळी ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत

करण १- गरज सकाळी ०७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज रात्री २० वाजून ०९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- सिंह अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ११ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २३ वाजून २८ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी

भरती- रात्री ०३ वाजून ३२ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ३४ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०९ वाजून ५५ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून २० मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ०९ वाजून ५४ मिनिटांपासून सकाळी ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत

दिनविशेष:- नाताळ.
३३६ साली रोममध्ये पहिल्यांदा नाताळ सण साजरा करण्यात आला. नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

आय.एन.एस. विजयदुर्ग (के ७१) ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.

१९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी. वर्ल्ड वाईड वेब अर्थात वेब. ही इंटरनेट संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे.

१९२४ साली भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म झाला.

१९९४ साली भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन झाले.