सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई:- ‘तिमिरातूनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांना सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईकडून सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुंबई सीमाशुल्क विभागांत कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रेडकर यांचे स्पर्धा परीक्षेसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल, धारावी येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई नगरपाल जगन्नाथराव हेगडे, सुकृत खांडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. रेडकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ओळखून त्याची दखल घेत मुंबई येथील सामाजिक संघटनेने पुरस्कार प्रदान करणे ही विशेष बाब आहे. श्री. रेडकर यांनी संपूर्ण कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची एक चळवळ उभारली आहे. त्यातून ते विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करत आहेत.