महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक

कणकवली:- माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल काल जाहीर करण्यात आला. ह्या वर्षीही महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७ टक्क्यांनी वाढ होत सलग दहाव्या वर्षी जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल म्हणजे 98.93 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील ५ मुलांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर जिल्ह्यातील २२७ पैकी १६९ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. कोकण बोर्डचा निकाल 98.77 टक्के असून सलग नवव्या वर्षी महाराष्ट्रात कोकण बोर्ड अव्वल स्थानी आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्य:-

१) आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेची प्राची अनिल तायशेटे, कासार्डे विद्यालयाची मृण्मयी गायकवाड, विद्यामंदिर कणकवलीची सिद्धी मोरे, श्रावणी मणचेकर, कुडाळ हायस्कूलची आस्था आनंद मर्गज या मुलींनी १०० टक्के गुण.

२) दहावी परीक्षेसाठी ११ हजार १८५ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी, त्यातील ११ हजार १८० विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ११ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण.

३) ५ हजार ७०४ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ३ हजार ८८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार ३१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १६६ विद्यार्थी उत्तीर्ण.

४) वेंगुर्ले तालुक्याचा सर्वाधिक निकाल ९९.५७ टक्के लागला आहे. वैभववाडी तालुक्याचा निकाल ९९.३२ टक्के, सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९.०९ टक्के, कणकवली तालुक्याचा निकाल ९९.०८ टक्के, मालवण तालुक्याचा निकाल ९९.०४ टक्के, कुडाळ तालुक्याचा निकाल ९८.७३ टक्के, देवगड तालुक्याचा निकाल ९८.३७ टक्के, दोडामार्ग ९८.३५ टक्के

५) पुनर्परीक्षार्थीचा सिंधुदुर्गचा निकाल ७७.१७ टक्के. परीक्षेस बसलेल्या ४६० विद्यार्थ्यांपैकी ३५५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.