जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम
सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दीपक घाटे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.
ज्या अर्जदारांनी सन २०२१-२२ या वर्षात समिती कार्यालयात अर्ज सादर केले आहेत आणि ज्यांची प्रकरणे त्रुटी अभावी प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांचे नुकसान होऊ नये यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झाले नाही. अशा अर्जदारांनी किंवा त्यांच्या पालकांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्याकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पुर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि मुळ व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्जदारांकडून या कालावधीत त्रुटी पुर्तता/कागपत्राची पुर्तता करण्यात आली नाही तर त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील व त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने अर्ज सादर करावा लागेल. तरी संबंधित अर्जदारांनी त्यांच्या त्रुटीची पुर्तता दि. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गद्वारे करण्यात आले आहे.