मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली! – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

मुंबई:- “मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली. यापुढेही मुंबईच्या विकास कामांचा दर्जा अधिक चांगला ठेऊन मुंबईसाठी चांगल्यातील चांगलं देऊ!” असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज जोगेश्वरी पश्चिम येथे झालेल्या कार्यक्रमात केले. ते नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने शिक्षणात आधुनिकता आणली. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकडे ५४ हजार शैक्षणिक टॅब आहेत. शैक्षणिक विकासाची घोडदौड अशीच पुढे न्यायाची आहे. नऊ भाषेतून साडेतीन लाख विद्यार्थ्यांना महानगरपालिका शिक्षण देते आणि आता मुंबईकरांचा विश्वास महानगरपालिका शाळांवर वाढत चाललाय. खाजगी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण महानगरपालिका देतंय. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा दोन पावलं पुढे असतात. मनपाच्या शाळेत दर्जेदार शिक्षण नेहमी मिळावं हे माझं स्वप्न आहे.
सगळ्या इंटरनॅशनल बोर्ड्सचे शिक्षण मनपाच्या शाळेतून मिळायला सुरुवात झालेली आहे. हे विनाशुल्क शिक्षण असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच म्हणतात की, महाराष्ट्र जे काही करायचे ते चांगल्यात चांगलं करू!”

ओशिवरा अब्दुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण आणि प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी शिवसेनेचे उपविभागप्रमुख, नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी संसदीयकार्य-परिवहनमंत्री विधिज्ञ श्री. अनिल परब, शिवसेना नेते खासदार श्री. गजानन किर्तीकर, आरोग्य समिती (म. न. पा.) अध्यक्षा- श्रीमती राजुलताई पटेल, शिक्षण समिती (म. न. पा.) अध्यक्षा- सौ.संध्या दोशी, बाजार व उद्यान समिती (म. न. पा) अध्यक्षा- सौ.प्रतीमाताई खोपडे, शिवसेना नेते शैलेश फणसे आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटलीपुत्र नगर मधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असो.चे पदाधिकारी आणि सभासद कार्यक्रमास उपस्थित राहून नगरसेवक राजू पेडणेकर यांना विकासकामांबाबत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौ. सोसायटी असो.चे सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार मुख्तार अहमद, चेतन नाईक, प्रकाश सोनाळकर, शरद हट्टंगडी, व्ही. ए. भट, अमोल चौगुले, रमेश कुंभार, अब्ररार सय्यद, मुग्धा सावंत, नेहा गुप्ता, सबिरा शेख, नुझहत शेख, श्रीमती अनुश्री अहिरेकर, मंजू गुप्ता, भक्तराज भाग्यवान, मोहम्मद रय्यान सोंदे, संतोष आणि सर्व इमारतींमधील पदाधिकारी रहिवाशी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page