पत्रकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

सावंतवाडी:- पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती व कोरोना संबधी अधिकृत आकडेवारी देण्यासाठी खेड्यापाड्यातून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. पत्रकारितेचे काम करत असताना अनेक पत्रकारांना कोरोना महामारीचा फटका बसला असून या महामारीत अनेक पत्रकारांचा मृत्यूही झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीचा हातभार लावणे गरजेचे आहे. तसेच गेली अनेक वर्षे पत्रकारितेत काम करत असलेल्या पत्रकारांना पेन्शन लागू करावी व कोरोनाकाळात काम करत असलेल्या पत्रकारांना विमाकवच शासनाने द्यावे; अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सावंतवाडी शाखेच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भाईप, उपाध्यक्ष प्रसन्न गोंदावळे, जिल्हा कार्यकरणी सदस्य मिलिंद धुरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद कांडरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page