लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- कोरोना महामारीने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले असून एकीकडे अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे प्रचंड मनस्ताप जनतेला जनतेला सोसावा लागतोय तर दुसरीकडे लसीकरणासाठी लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या व्यक्ती येत नसल्याने लस वाया जाते; असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने ठोस भूमिका घेऊन लस वाया जाऊ नये म्हणून नियोजन करावे अशी मागणी जनता करीत आहे.

यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीकडे देवगड तालुक्यातील इळये येथील लक्ष्मण पाताडे आपली कैफियत मांडली. लक्ष्मण पाताडे म्हणतात की, आमच्या गावच्या इळये प्राथमिक हॉस्पिटलला दिनांक ७- ०५-२०२१ ला १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लोकांना कोविड लसीकरण होते. त्यासाठी १६० डोस आले होते. ते ऑनलाईन बुकिंग केलेले होते. असे असताना ९ लोक ती लस बुकिंग केलेली असताना घ्यायला आले नाहीत. त्यामुळे ते ९ लसीचे डोस फुकट गेले.

लक्ष्मण पाताडे पुढे सांगतात की, देशामध्ये लसीची कमतरता असताना व अनेकजण लस मिळण्यासाठी आटापिटा करत असताना सिंधुदुर्ग जिल्हयाची आरोग्य यंत्रणा या कोरोना लसीकरणाबाबत जागरूक दिसत नाही. यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्राला शेवटच्या अर्ध्या तासात जेवढी लस उरली असेल तेवढी लस लसीकरण करण्यासाठी स्पॉट बुकिंगची परवानगी द्यावी. मी आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी यावर चर्चा केली. त्यांचे म्हणणे असे; त्यांना जिल्ह्यावरून आदेश आहेत की बुकिंगशिवाय लस द्यायची नाही.

मी स्वतः १ मे पासून लस मिळण्यासाठी बुकिंग करतोय; तर बुकिंग होत नाहीय आणि ज्यांची बुकिंग होतेय ते लस फुकट घालवत आहेत. जे लोक बुकिंग करून लस घेत नाहीत त्यांना नंतर ही लस मोफत देऊ नये; अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वजण असेच बुकींग करून लस फुकट घालवत राहतील आणि कोरोनाचे संकट असच वाढत राहील; असाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याबाबत ठोस निर्णय घेऊन लस वाया जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी अशी जोरदार जोरदार मागणी जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page