उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १० मे २०२१
सोमवार दिनांक १० मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – २०
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष चतुर्दशी २१ वा. ५५ मि. पर्यंत
नक्षत्र- अश्विनी २० वा. २४ मि. पर्यंत
योग- आयुष्मान २१ वा. ३७ मि. पर्यंत
करण १- विष्टि ०८ वा. ४१ मि. पर्यंत
करण २- शकुनी २१ वा. ५५ मि. पर्यंत
राशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०८ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून ०२ मिनिटे
भरती- ११ वाजून ४० मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून १२ मिनिटे
भरती- २३ वाजून २५ मिनिटे, ओहोटी- १७ वाजून ३७ मिनिटे
दिनविशेष:-
जलसंधारण दिन – महाराष्ट्र.
१८५७ – पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९०९ – सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले.
१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
जन्म:-
१८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर