‘तुला पाहता’- बुद्धीबळ आणि संगीत एकरूप करणारी निखळ प्रेमाची जुनी-नवी गोष्ट!

मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ सिनेमाचा प्रीमिअर शो संपन्न; १० जुलैला जगभरात प्रदर्शित होणार

मुंबई (इकबाल शेख)- प्रेमकथांच्या साचेबंद चौकटी मोडत दोन पिढ्यांतील भावविश्व, नातेसंबंध आणि काळाच्या ओघात बदलणाऱ्या प्रेमाच्या छटा अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने मांडणाऱ्या ‘तुला पाहता’ या मराठी चित्रपटाचा प्रीमिअर शो नुकताच अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृहात उत्साहात पार पडला. या प्रसंगी सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट (प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन) मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार तसेच चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा चित्रपट १० जुलै रोजी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

आजवरच्या अनेक प्रेमकथांमध्ये एकाच प्रेमप्रवासावर भर दिला जातो. मात्र, ‘तुला पाहता’ या चित्रपटात १९७१ आणि २०२६ या दोन वेगवेगळ्या काळातील दोन प्रेमकथा समांतरपणे उलगडताना दिसतात. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते दिमाखात प्रदर्शित करण्यात आला होता. तरल भावना, काळाच्या पलीकडे जाणारे प्रेम आणि दोन पिढ्यांतील नात्यांचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडविणारी ठरणार आहे.

कथेच्या मध्यभागी असलेली प्रेमकहाणी एका अशा तरुण-तरुणीची आहे की, प्रेमाच्या शिखरावर असतानाच तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनंतर तो पुन्हा तिच्यासमोर उभा राहतो—यावेळी निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून. त्याच्या अचानक जाण्याने आणि तितक्याच अनपेक्षित पुनरागमनाने तिच्या आयुष्यात निर्माण होणारी भावनिक खळबळ चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. त्याचबरोबर आधुनिक काळातील एका तरुण जोडप्याची प्रेमकथाही समांतरपणे उलगडत जाते. प्रेम, नातेसंबंध, एकत्र कुटुंब व्यवस्था, भावनिक गुंतागुंत आणि जीवनमूल्ये अशा अनेक पदरांनी ही कथा समृद्ध झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हळवी कथा, मधुर संगीत, संवेदनशील लेखन आणि दर्जेदार अभिनयाचा अनुभव मिळणार आहे.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग, ध्वनी आरेखन रोहित प्रधान, संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले, तर नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांची प्रभावी भूमिका आहे. नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

प्रीमिअर शो पाहिल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. चित्रपटाचे शीर्षक, संगीत, संवाद, कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन यांचे विशेष कौतुक करत हा चित्रपट मनाला भिडणारा असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर, गाणी आणि ट्रेलरलाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्यामुळे १० जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘तुला पाहता’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

A Pure Love Story That Unites Chess and Music Across Generations!
Heartwarming Marathi Film `Tula Pahata’ Holds Grand Premiere; Set for Worldwide Release on July 10

Mumbai | Iqbal Sheikh

Breaking away from the conventional mold of romantic dramas, the Marathi film Tula Pahata beautifully portrays the emotional journey of two generations, exploring love, relationships, and the changing shades of romance through time. The grand premiere of the film was recently held at PVR Cinemas in Andheri, Mumbai.

The event was attended by Mayank Shroff, Head of Programming and Distribution at Cinépolis, popular actor Sushant Shelar, and the entire cast and crew of the film. Tula Pahata is scheduled for a worldwide release on July 10 in both Marathi and Hindi languages.

Unlike most romantic films that revolve around a single love story, Tula Pahata presents two parallel love stories set in 1971 and 2026. The film’s trailer was recently launched in a grand event by renowned actor Mushtaq Khan. Blending timeless emotions with contemporary storytelling, the film promises to take audiences on a touching emotional journey across generations.

At the heart of the story is a young couple deeply in love when the man suddenly disappears from the woman’s life. Years later, he unexpectedly returns—this time as a retired Army officer. His mysterious departure and equally unexpected return create emotional upheaval, forming the core of the narrative. Alongside this, the film also unfolds the love story of a modern-day young couple, creating a compelling contrast between two eras.

The film explores several emotional layers, including love, family relationships, the values of a joint family, and the complexities of human emotions. With its heartfelt storytelling, soulful music, sensitive screenplay, and powerful performances, Tula Pahata promises a memorable cinematic experience.

Produced under the banner of Brave Wheel Productions, the film is written, directed, and produced by Mayura Pradhan, who has successfully handled the triple responsibility of writer, director, and producer in her debut feature film.

The cinematography is by Pushkar Jhoting, sound design by Rohit Pradhan, music by Rohan Pradhan and Rohan Gokhale, and choreography by Dipali Vichare.

The film features an impressive ensemble cast, including veteran actors Satish Pulekar and Ila Bhate, along with Nachiket Lele, Mansi Patil, Nishigandha Wad, Anand Kale, Dipali Vichare, Pallavi Ajay, Swapnil Parajane, and Akash Shinde. The combination of seasoned performers and young talent adds further depth to the film.

Following the premiere, the audience showered the film with praise. Viewers appreciated its title, music, dialogues, story, performances, and direction, describing it as an emotionally moving and beautifully crafted film. The teaser, songs, and trailer have already received an enthusiastic response from audiences, building significant anticipation for its worldwide theatrical release on July 10.

error: Content is protected !!