कॉस्मोपोलीटन सोसायटीत झेंडावंदन आणि गार्डनचे उदघाटन आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या हस्ते होणार!

मुंबई:- कॉस्मोपोलीटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या आवारात उद्या सकाळी स्वातंत्र्यदिनानिमित्त होणारे झेंडावंदन आणि सोसायटीतील सुशोभिकरण गार्डनचे उदघाटन लोकप्रिय आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय नगरसेवक श्री. योगीराज दाभाल़कर आणि श्रीमती रंजना पाटील उपस्थित राहणार आहेत.

उद्या भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन असून त्यानिमित्ताने जोगेश्वरी ( प. ), पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपोलीटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या आवारात सालाबादप्रमाणे झेंडावंदनाला कार्यक्रम होणार असून त्यावेळी शासनाच्या नियमांनुसार व्यवस्था करण्यात येणार आहे. आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचे आगमन झाल्यावर प्रथम त्यांच्या हस्ते झेंडावंदन होईल. त्यानंतर त्यांच्याच हस्ते सोसायटीतील सुशोभिकरण गार्डनचे उदघाटन होणार आहे. सदर गार्डनचे काम आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या आमदार फंडातून करण्यात आले आहे. त्यावेळी कॉस्मोपोलीटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्यातर्फे आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांना भव्य सत्कार होणार असून असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन सेक्रेटरी मोहन सावंत यांनी केले आहे.

सकाळी १०.१५ वाजता सोसायटीमध्ये आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचे आगमन होणार असून त्यावेळी झेंडावंदन नंतर सोसायटीतील सुशोभिकरण गार्डनचे उदघाटन १०.४५ वाजता होईल आणि ११.०० वाजता व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page