उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार १६ ऑगस्ट २०२१
सोमवार दिनांक १६ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष अष्टमी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटापर्यंत
नंतर नवमी १७ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ३४ मिनिटापर्यंत
नक्षत्र- अनुराधा १७ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजून ०१ मिनिटापर्यंत,
योग- ऐंद्र १७ ऑगस्टच्या पहाटे २ वाजून ५५ मिनिटापर्यंत
करण १- बव सकाळी ०७ वाजून ४५ मिनिटापर्यंत नंतर कौलव १७ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ३४ मिनिटापर्यंत,
करण २- बालव संध्याकाळी १८ वाजून ४० मिनिटापर्यंत
चंद्रराशी- वृश्चिक अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २२ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०३ मिनिटांनी आणि
चंद्रोदय- दुपारी १३ वाजून २९ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री १२ वाजून ०९ मिनिटापर्यंत.
ओहोटी- सकाळी ११ वाजून ३० मिनिटे
भरती- पहाटे ५ वाजून ४० मिनिटे आणि दुपारी १७ वाजून १७ मिनिटे
दिनविशेष:- दुर्गाष्टमी, श्रावणी सोमवार, शिवपूजन, पारशी नववर्ष १३९१ प्रारंभ,
आज आहे रामकृष्ण परमहंसांचा समाधी दिन! १६ ऑगस्ट १८८६ रोजी ते ब्रह्मानंदी लिन झाले. हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्ट २०१८ साली झाले. त्यांच्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय आहेत.
ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत ते पंतप्रधान होते.
यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते, जनता पक्षाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते, ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.