भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिअल लाईफ खेळाडूंनी आम्हाला ट्रेन केलं! -अभिनेता गौरीश शिपुरकर

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- नाटक आणि सिनेमांमधून उत्तमोत्तम अभिनय करणारा अभिनेता ‘गौरीश शिपुरकर’ आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तो सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, तसेच ‘विजेता’ हा सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

गौरीश शिपुरकरला विजेता सिनेमातील भूमिकेविषयी विचारता तो म्हणाला, “मी विजेता सिनेमात शॉटपुट खेळाडूची भूमिका साकारत आहे. शॉटपुट हा खेळ खूप सोप्पा वाटतो. पण तुम्ही हा खेळ जेव्हा प्रत्यक्षात खेळता. तेव्हा त्यात किती मेहनत करावी लागते; हे या सिनेमामुळे कळलं. प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते नियम लक्षात ठेवून त्याप्रमाणे खेळायचं, तितकाच सराव आणि व्यायाम करावा लागतो. त्यामुळे हे फार अवघड आहे. शॉटपुट या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणारा शुभम यादव आणि ललित सावंत यांनी मला या भूमिकेसाठी मोलाची साथ दिली.

पुढे तो सांगतो, “शुटींगच्या दोन महिन्यांपूर्वी आमचा वर्कआऊट आणि डायट सुरू होता. मी सकाळी चार ते नऊ आणि संध्याकाळी सात ते दहा असा वर्कआऊट करायचो, दोन वेळेस जीमला जावं लागायचं. तसेच दररोज सर्व प्रोटीनयुक्त डायट सुरू होता. आम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी संपूर्ण ट्रेन केलं. आम्ही सेटवर त्यांच्याकडून खेळाविषयी आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाविषयी जाणून घेतलं. तसेच माझ्यासाठी ही भूमिका फार चॅलेजींग होती.”

You cannot copy content of this page