सद्गुरूंचे चरण दर्शनानेच सहस्रकोटी संकटे पळून जातात!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सोळावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने ।
सहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥

त्रिविक्रमांच्या चरणांचे निःशंक मनाने ध्यान केल्यावर हजारो प्रकारची संकटे किंवा हजारो कोटी संकटे भयाने पळतात.

निःशंक ध्यान म्हणजे कोणतीही शंका मनात न ठेवता. `समोरच्या संकटाच्यापेक्षा माझा देव खूप खूप खूप मोठा आहे’ अशा विश्वासाने ध्यान करणे.

संकट दुःखदायक वाटते कारण ते भय निर्माण करते. पण सद्गुरु त्रिविक्रम चरणांचे ध्यान संकटांनाच भय देते आणि पळवून लावते.

ध्यान शब्दाची व्युत्पत्ति ध्यै ( ध्यैयित्तायाम् ) धातुपासून झाली आहे. त्याचा अर्थ आहे ‘ चिंतन करणे’. व्यवहारात याचा अर्थ मन एकाग्र करणे, एखाद्या विषयावर मन स्थिर करणे असा आहे. त्यामुळे मानसिक शक्तीचे केंद्रीकरण होऊ लागते.

महर्षि पतंजलि म्हणतात ,

तत्र प्रत्यैकतानताध्यानम्।।
पातंजल योग सूत्र 3/2

डोळे मिटून बापूंना आठवायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय येते? त्यांचे सुंदर रूप येते, त्यांचा अभयहस्त येतो, हृदयाला खेचून नेणारे त्यांचे हसणे येते. हे सर्व छानच आहे. ज्यात प्रेम आहे ते सर्व छानच आहे. पण चरणांच्या दर्शनाची, ध्यानाची तृष्णा असणारे भक्तही अभ्यासायला हवेत.

सुंदरकांडात आम्ही पाहतो. बिभिषण रावणाचा भाऊ आहे, राक्षस आहे, लंकेत राहतो, श्रीरामांना पाहिलेही नाही. रावणाने लाथ मारून हाकलल्यानंतर तो श्रीरामचरणांचे दर्शन होईल असा मनात विचार करतो आणि श्रीराम जिथे आहेत तिथे येतो. त्याच्या मनातले विचार काय आहेत ? श्रीरामांच्या दर्शनाचे नाहीत. त्यांच्या चरणांच्या दर्शनाचे आहेत. निव्वळ देवाच्या चरणांची प्रीती दिसते.

देखिहउँ जाइ चरन जलजाता। अरुन मृदुल सेवक सुखदाता।।
जे पद परसि तरी रिषिनारी। दंडक कानन पावनकारी।।
जे पद जनकसुताँ उर लाए। कपट कुरंग संग धर धाए।।
हर उर सर सरोज पद जेई। अहोभाग्य मै देखिहउँ तेई।।
दोहा – जिन्ह पायन्ह के पादुकन्हि भरतु रहे मन लाइ।
ते पद आजु बिलोकिहउँ इन्ह नयनन्हि अब जाइ।।

श्रीगुरुचरित्र १४ व्या अध्यायात सायंदेव श्रीगुरुंना विनवतात,

तुमचे चरणाविणें देखा । राहो न शके क्षण एका ॥ संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥

बापूंनी १५ एप्रिल २०१० च्या पितृवचनात अशाच एका भक्ताविषयी मोठ्या प्रेमाने सांगितले ते त्यांच्याच शब्दात पाहू ,

जब भी साईबाबा रास्ते में चलते थे तो राधाकृष्णामाई, नेवासकर और उनसे ज्यादा नानासाहेब चांदोरकर उनके आगे-आगे चलते थे। रास्ते में कोई काँटा ना हो, बाबा के पाँव को चुभे नहीं। कोई छोटा कंकड-पत्थर ना हो, जो बाबा को चुभे नहीं, कोई गाई का, भैंस का गोबर या कुछ ऐसा कुछ ना हो घोड़े का, तो उसे हटाना है, कोई पंछी आकर अपनी शीट वहाँ ना डाले आगे, बरसात के दिन हैं तो पैर फिसल सकता है। बाबा सब जानते हैं, बाबा का सामर्थ्य महान है, वो बाबा के लिए हमारा कर्तव्य क्या है ? उनकी केअर करना। नानासाहेब चांदोरकर ने ऐसा नहीं सोचा कि बाबा तो सर्वसमर्थ हैं, हम जब उपर से नीचे गिरें तो भी हमें बचाते हैं तो यहाँ बरसात के दिन क्या उनके आगे जाकर रस्ते को ठीक करना? नहीं। उन्होंने ऐसे नहीं सोचा कि बाबा तो जीवन का सबसे बड़ा काँटा भी निकाल देते हैं, ये छोटे काँटों की उन्हें क्या परवाह ? नहीं, ये उन्होंने नहीं सोचा। हमेशा उनके सामने चलते रहे बेचारे। बेचारे कहना ग़लत है। वो सबसे रईस थे, वो बेचारे नहीं थे, सबसे स्मार्ट थे। वो बाबा को भी नहीं देखते थे, तो किसे देखते थे ? बाबा के चरणों को भी नहीं देखते थे, बाबा के चरण जहाँ पड़े हैं, जहाँ से गुजरे हैं उस रास्ते को नहीं देख रहे थे।

तो जहाँ बाबा के चरण पड़नेवाले हैं, रखनेवाले हैं बाबा, उस रास्ते को देख रहे थे। यानी चरणों को भी नहीं देख रहे हैं, You Are getting it ? समझ में आया ? क्या भक्तिभाव है देखिए। बाबा के चरण देखने की भी चाहत नहीं है। वो चरण जहाँ रखनेवाला हैं, उस जगह पर उनके के लिए कुछ uncomfortable ना हो, उन्हें तकलीफ़ देनेवाला कुछ ना हो, ये देखते थे। पूरी जिंदगी नानासाहेब ने यही व्रत लिया था। इतना ही नहीं, बताता हूँ, जब साईबाबा की अंतिम यात्रा निकली थी, उस दिन भी नानासाहेब कितने दुख में होंगे आप जानते हैं, फिर भी नानासाहेब चांदोरकर उस दिन भी वही काम कर रहे थे, रोते-रोते, ‘जो लोग उठाके ले जा रहे थे उनके पैरों को कुछ ना लगे, उन्होंने मेरे बाबा को उठाया हुआ है। ’अपना पूरा दुख समेट कर नानासाहेब चांदोरकर यही काम कर रहे थे। क्या बात है देखो ! ये हुआ ‘अभिसंवाहन’!
– सद्गुरु अनिरुद्ध बापू पितृवचन १५ एप्रिल २०१०

सद्गुरूंचे चरण हा त्यांच्या सगुण साकार रूपाचा पृथ्वीला सतत स्पर्श होणारा शरीराचा सर्वात खाली असणारा भाग. आम्हाला त्याचे ध्यान करायचे असले तर तो आमच्या मनाच्या समोर सतत हवा. त्यासाठी आम्हाला नत व्हायला हवे. चरणांचे अखंड ध्यान करायचे तर सद्गुरु समोर अखंड नत असायला हवे. जो असा वाकतो, त्याच्यासाठी; सद्गुरु प्रारब्ध वाकवतो, संकटांना वाकवतो, दिशाकाळांनाही वाकवतो आणि अखेर स्वतः वाकून अशा बाळाला कडेवर घेतो……

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पंधरावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page