सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 866 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.):- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 83 हजार 866 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 32 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 667 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील 1 लाख 20 हजार 516 व्यक्तींनी पहिला डोस तर 79 हजार 935 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 42 हजार 742 नागरिकांनी पहिला डोस तर 88 हजार 656 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 857 जणांनी पहिला डोस तर 69 हजार 840 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. अशा एकूण 7 लाख 38 हजार 996 लसी देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 50 हजार 120 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 69 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 80 हजार 640 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 72 हजार 651 कोविशिल्ड आणि 1 लाख 66 हजार 345 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 38 हजार 996 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 55 हजार 160 लसी उपलब्ध असून त्यापैकी 36 हजार 530 कोविशिल्डच्या आणि 18 हजार 630 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 870 लसी शिल्लक असून त्यापैकी 2 हजार 260 कोविशिल्ड आणि 610 कोवॅक्सीनच्या लसी आहेत.

You cannot copy content of this page