उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१

सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष चतुर्थी दुपारी १३ वाजून १७ मिनिटापर्यंत
नक्षत्र- मूळ सायंकाळी १८ वाजून ४८ मिनिटापर्यंत
योग- सुकर्मा दुपारी १५ वाजून २६ मिनिटापर्यंत
करण १- विष्टि दुपारी १३ वाजून १७ मिनिटांपर्यंत
करण २- बव रात्री २३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- धनु अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता

चंद्रोदय- सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री २१ वाजून ३० मिनिटांनी

भरती- रात्री ०२ वाजून ०३ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ४८ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०८ वाजून ०५ मिनिटांनी आणि सायंकाळी २० वाजता

दिनविशेष:- आज आहे विनायक चतुर्थी, जागतिक शहरीकरण दिन आणि आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९०९: साली स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म झाला.
१९१७: साली कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म झाला.
१९१९: साली प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म झाला.
१९२७: साली भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म झाला.
२०१६: साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.
२०१६: साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.