पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१

गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २७
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष चतुर्दशी दुपारी १२ वाजेपर्यंत
नक्षत्र- भरणी १९ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०१ वाजून २८ मिनिटापर्यंत
योग- वरियान १९ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ५७ मिनिटापर्यंत

करण १- वणिज दुपारी १२ वाजेपर्यंत
करण २- विष्टि १९ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०१ वाजून ११ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५० मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १७ वाजून २२ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०५ वाजून ४७ मिनिटांनी

भरती- सकाळी ११ वाजून ०७ मिनिटांनी आणि रात्री २३ वाजून ५७ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून २१ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १३ वाजून ४८ मिनिटांपासून सायंकाळी १५ वाजून १२ मिनिटांपर्यंत आहे.

दिनविशेष:- आज आहे वैकुंठ चतुर्दशी.

१९५६ साली १८ नोव्हेंबरला कार्तिक अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंचा अर्थात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांचा जन्म झाला. वैद्यकीय, आध्यात्मिक, सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यांनी उभे केलेले कार्य प्रत्येक मानवाला सामर्थ्यशील करते.

ऐतिहासिक दिनविशेष:-

१८८२ साली अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

१९०१ साली चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म झाला.

१९९३ साली मानसशास्त्रज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, विज्ञानाधिष्ठित विचारवंत, लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांनी समाधी घेतली.