पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१

शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक पौर्णिमा दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- कृत्तिका २० नोव्हेंबरच्या पहाटे ०४ वाजून २८ मिनिटापर्यंत
योग- परिघ २० नोव्हेंबरच्या पहाटे ०३ वाजून ५० मिनिटापर्यंत

करण १- वणिज दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत
करण २- बालव २० नोव्हेंबरच्या पहाटे ०३ वाजून ४४ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- मेष सकाळी ०८ वाजून १२ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५० मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- सायंकाळी १८ वाजता
चंद्रास्त- सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांनी होईल

भरती- सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ४६ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत आहे.

आध्यात्मिक दिनविशेष
त्रिपुरारी पौर्णिमा.
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची अभेद्य तट असणारी तीन नगरे होती. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शिव शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते.
या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

दिनविशेष:-
आज आहे जागतिक शौचालय दिन.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘१९ नोव्हेंबर’ हा दिवस ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आज आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
समाजात फक्त महिलांवरच अत्याचार होतो असं नाही. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

महिला उद्योजकता दिन
जागतिक महिला उद्योजकता दिन अर्थात स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा उत्सव!

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८२८ साली उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला.