उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२१

सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष पंचमी अहोरात्र
नक्षत्र- मृगशीर्ष २६ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजून ९ मिनिटांनी
योग- परीघ २६ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून ३५ मिनिटापर्यंत

करण १- कौलव सायंकाळी १९ वाजून ०४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ दुपारी १४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०७ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २१ वाजून ३१ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी

भरती- रात्री ०२ वाजून १९ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ५६ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ५९ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष
१९५१ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

२००३ साली कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन झाले. पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादा तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते.