उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१

रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ०४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष पंचमी दुपारी १३ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- कृत्तिका दुपारी १४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
योग- वज्र दुपारी १५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल दुपारी १३ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
करण २- गरज २७ सप्टेंबरच्या उत्तररात्री २ वाजून २३मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २९ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- रात्री २२ वाजून ०६ मिनिटांनी तर
चंद्रास्त- सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून ४० मिनिटांनी तर
भरती- रात्री २ वाजून ४६ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ३२ मिनिटांनी असेल.

दिनविशेष:- आज आहे कर्णबधिर दिन आणि युरोपीय भाषा दिन.

जन्म:-
१९३१: साली भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म.
१९३२: साली भारताचे माजी पंतप्रधान थोर अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचा जन्म.
त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य दिले. मनमोहन सिंग सन १९५७ ते १९८२ दरम्यान चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठात आणि, दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक तसेच दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून कार्य केले. १९८२ ते १९८५ दरम्यान ते भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर आणि १९८५ से १९८७ ह्या काळात भारतीय योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले. १९९१ साली नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये ते अर्थमन्त्री तर २००४ ते २०१४ दरम्यान भारताचे पंप्रधान म्हणून त्यांची यशस्वी कामगिरी केली.