उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१
मंगळवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष नवमी १ सप्टेंबरच्या पहाटे ०४ वाजून २३ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रोहिणी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
योग- हर्षण सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल दुपारी १५ वाजून १३ मिनिटांपर्यंत
करण २- गरज १ सप्टेंबरच्या पहाटे ०४ वाजून २३ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- वृषभ रात्री २३ वाजून १० मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २६ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५२ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय- रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी तर
चंद्रास्त- दुपारी १३ वाजून ५१ मिनिटांनी होईल.
ओहोटी- सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी
भरती- सकाळी ०६ वाजून २ मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ०६ मिनिटांनी
दिनविशेष:- मंगळागौरी व्रत आणि गोपाळकाला
ऐतिहासिक दिनविशेष:
१९२० साली अमेरिकेच्या डेट्रोइट शहरात ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
१९२० साली खिलाफत चळवळीची सुरुवात झाली
१९४७ साली भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१८७० साली इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी यांचा जन्म झाला. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते.
१९०२ साली रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे आणि
१९४० साली सुप्रसिद्ध मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म झाला.
१९७३ साली शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन झाले.