“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह

दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे वेगळा छंद उदयास आला.

अनेकांना पत्र लिहितालिहिता 2006 साली साध्या पोस्टकार्डवर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी आदरणीय विंदा करंदीकर यांचे पत्र आले. तोपर्यंत आपणही काहितरी छंद जोपासला पाहिजे, याबाबत काहिच ठरले नव्हते. अनेकजण “स्वाक्षरी संग्रह” (Autograph Collection) करतात. मात्र, आपण काहितरी वेगळे, आव्हानात्मक आणि सर्व थरातील लोकांना उपयुक्त ठरेल शिवाय भविष्यात तो ऐतिहासिक ठेवा ठरेल असे काहितरी करावे या ऊद्देशाने “विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्र संग्रह” करण्याचा छंद जोपासला. आणि या संग्रहाला सुरुवात झाली.

आजही यातील अनेक संदेश प्रोत्साहन देतात, नवी उभारी देतात, आनंदी आणि सकारात्मक आयुष्य कसे जगायचे याची नवी दृष्टी देतात. हेच या संग्रहाचे सर्वात मोठे यश म्हणता येईल. म्हणूनच हा संग्रह आगळा वेगळा ठरत आहे.

2006 ला विंदांच्या पोस्ट कार्डवरील पहिल्या पत्रापासून सुरु झालेल्या या संग्रहात आज देश आणि परदेशातील 1500 पेक्षा जास्त राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश झाला. विशेष म्हणजे त्यातून अनेक मान्यवर व्यक्तींशी पत्रमैत्री जुळली. ग्रामीण भागात राहून एका साध्या पत्राच्या माध्यमातून देश आणि परदेशातील असंख्य व्यक्तींशी संपर्क साधून मिळविलेल्या त्यांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह अनेकांच्या सहकार्याने अधिकाधिक समृद्ध होत आहे. तर तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे या संग्रहाचे सुंदर “अक्षरघर” उभारले आहे.

संदेश पत्र पोस्ट कार्डवरच का?
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात. त्याशिवाय पोस्टाद्वारे पत्रव्यवहार केल्याने परंपरागत सुरु असलेली पत्रव्यवहाराची भाषा अजूनही जीवंत ठेवली आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात
या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता निर्माता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी आणि डॉ. वेंकी रमन (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

या संग्रहाची वैशिष्ट्ये
1. देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज 1500 व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश.
2. या संग्रहात मराठी, हिंदी, इंग्रजी शिवाय संस्कृत, कोकणी, चायनीज, मोडी, उर्दू, ब्राम्ही आणि ब्रेल लिपितील संदेश पत्रांचा समावेश.
3. सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, शास्त्रज्ञ, कलावंत, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, छंदिष्ट्य, धार्मिक या क्षेत्रातील देश आणि परदेशातील व्यक्तींचा समावेश.
4. या संग्रहात नोबेल पुरस्कार प्राप्त, रेमन मैगसेसे पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभुषण पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र भुषण पुरस्कार, फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड, साहित्य अकादमी पुरस्कारासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविलेल्या तसेच जागतिक विक्रम केलेल्या महनीय व्यक्तींच्या संदेेश पत्रांचा समावेश.
5. तळेरे सारख्या ग्रामीण भागात राहून एका पत्राच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी पत्रमैत्री जुळली.
6. आजपर्यंत 5 हजारपेक्षा जास्त व्यक्तिंना 10 हजारपेक्षा जास्तवेळा पत्राद्वारे संपर्क.
7. या संग्रहाची महाराष्ट्रातील विविध दैनिके आणि वृत्त वाहिन्यांनी दखल घेऊन प्रसिध्दी दिली आहे. त्याबाबत विविध वाहिन्या, आकाशवाणी केंद्र यावर मुलाखत प्रसारित झाल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरील “नमस्कार मन्डळी” या कार्यक्रमात थेट (Live) मुलाखत प्रसारित तसेच, सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरुन मुलाखत प्रसारित.
8. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी या संग्रहाची विविध संस्था आणि शाळांनी प्रदर्शने आयोजित केली.
9. या संग्रहामुळे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
10. छंद प्रदर्शन आणि त्यातून शालेय विद्यार्थ्यांना “छंद का जोपासावा आणि त्यांचे आयुष्यात महत्व” मार्गदर्शन केले जाते.

येवा तुमचा स्वागत आसा, “अक्षर घर” आपलाच आसा…

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यटनाचे माहेरघर, जिल्ह्यात प्रत्येक प्रकारची पर्यटन स्थळे पहायला मिळतात. आणि ती पाहताना, डोळ्यात साठवताना, पुन्हा पुन्हा अनुभवताना परतीचा पाय निघत नाही. या मार्गातच अगदी मुंबई गोवा महामार्गावर एक आगळेवेगळे ठिकाण तुम्हाला आवर्जून पहायला मिळेल. नव्हे ते आवडेलही. तिथे तुम्हाला सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या समृध्द करणारा वेगळा अनुभव निश्चितच मिळेल. ते ठिकाण म्हणजे आपले “अक्षरघर” (“अक्षरोत्सव दालन”) आम्ही करीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांच्या संग्रहाचे एक सुन्दर अक्षर घर (अक्षरोत्सव दालन) केले आहे. या अक्षर दालनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली आहे.

आपणही आवर्जून एकदा या अक्षरघराला नक्की भेट द्या. आपले नेहमी स्वागतच असेल…

अक्षरघराला यांनी दिली भेट
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

सह्याद्री वाहिनी वरील नमस्कार मन्डळी या कार्यक्रमातील थेट (Live) मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…
https://youtu.be/VxqOpSlfLZM

महाराष्ट्रातील नामवंत गझलकार, ज्यांच्या शब्दांनी कविता आणि गझलचे अनेक कार्यक्रम रंगतात, 9व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिध्द गझलकार आदरणीय कै. मधुसूदन नानिवडेकर यांनी संदेश पत्र संग्रहाबद्दल व्यक्त केले मत, वाचा या लिंकवर…
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3492670757518979&id=100003282665163

सुप्रसिध्द कवी, गीतकार, मोटिवेशनल स्पीकर आदरणीय प्रसाद कुलकर्णी यांनी अक्षर घरा बद्दल व्यक्त केलेले मत वाचू शकता खालील लिंक वर…
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10219144096304839&id=1580114221&sfnsn=wiwspmo&extid=fX7aGzf1kcx2G9Kc
_ * _
साम मराठी या वाहिनीवरील हस्ताक्षर संग्रहावर केलेला विशेष रिपोर्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
Niket Pawaskars unique collection of handwriting :
https://youtu.be/eYGHXAYwuSQ

Think Maharashtra या संकेतस्थळावरील माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
http://www.thinkmaharashtra.com/index.php/node/2676

दादर येथील या संग्रहाच्या प्रदर्शनाबाबत दै. महाराष्ट्र टाइम्सचे विशेष वृत्त, वाचा खालील लिंकवर…
https://youtu.be/8qlJzpfTUqo

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर http://iyemarathichiyenagari.com/niket-pawaskar-message-letters-exhibition-in-dadar-post-office/

संग्राहक : निकेत पावसकर, (तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) मोबा. 9860927199 / 9403120156)
जन्मतारीख : 03 जून 1985
Email : niketpavaskar@gmail.com

Digital Visit Card :
https://www.dibiz.com/niketpavaskar

You cannot copy content of this page